बोल्हेगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला - आमदार संग्राम जगताप
नगर : बोल्हेगाव नागापूर परिसर हा पूर्वी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात असे या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, जवळ एमआयडीसी असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहे त्यांना विकासाच्या सुविधा देण्यासाठी माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पाठपुरावा सुरू केला, नागरिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध, दर्जेदार व कायमस्वरूपीची कामे मार्गी लावली, त्यामुळे त्यांनी विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादित केला आहे, आज हा भाग नव्याने विकसित होत असून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे आम्ही सर्वांनी शहरात चांगले काम उभे केले असल्यामुळेच नागरिक समाधान व्यक्त करीत आहे, दर्जेदार रस्त्याचे जाळे उभे राहत असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल व नागरिक सुखकर प्रवास करतील असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
बोल्हेगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे, रमेश वाकळे, ज्ञानदेव कपडे, दशरथ वाकळे, हबीब शेख, सुनील भालेराव, अजय जगदाळे, सचिन कांबळे, मुनीर शेख, दत्तात्रय ढाकणे, बद्रीनाथ उपळे, अशोक पावले, जालिंदर कवडे, कैलास पवार, चांद शेख, गणेश पाटील, नारायण सरदार, गोरक्षनाथ दरेकर, अजय पाठक, विलास जाधव, विद्या आदमीले, अमृता कारकुंड, मनीषा नाईक, अनिता महाजन, सुनिता साळी, सुरेखा आढाव, किसन भिंगारदिवे आदी उपस्थित होते
यावेळी कुमारसिंह वाकळे म्हटले की, बोल्हेगाव परिसरातील विकास कामांचे नियोजन करून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून एक एक काम हाती घेत कायमस्वरूपी मार्गी लावले आहे त्यामुळे प्रभागाचा विकास कामातून कायापालट झाला आहे, गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांशी असलेल्या संवादातून विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी मदत झाली आहे त्यामुळेच प्रभागांमध्ये चांगले काम उभे करू शकलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
चौकट : मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगर मधील अंतर्गत कॉंक्रिटीकरण रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपल्या घरासमोर रांगोळी काढून विकास कामाचे स्वागत केले, तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या आगमनावेळी फुलांचा वर्ष करण्यात आला भर पावसात नागरिकांनी आमदार संग्राम जगताप व कुमारसिंह वाकळे यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या