न्यू आर्टस कॉलेज ते अप्पू हत्ती चौक पर्यंतच्या रस्ता दुरुस्ती कामाची पाहणी आज आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या सोबत केली.
खड्डे मुक्त शहर निर्माण करणे हाच आपला संकल्प असून विकासकामांमधून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शहरांमधील बहुतांश भागामध्ये रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये टिळक रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्ता, परमपूज्य आनंदऋषीजी महाराज मार्ग, स्वस्तिक चौक, कोठी रस्ता, बालिकाश्रम रोड, केडगाव लिंक रोड, सोलापूर रोड, कानडे मळा, सीएसआरडी कॉलेज पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लावली आहेत. त्याबरोबरच विविध भागातील कॉलनी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे देखील पूर्ण झाली आहेत.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते माळीवाडा वेशीपर्यंतच्या शिवजयंती मार्ग वरील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू होणार आहे.
दिल्ली गेट-न्यू आर्टस कॉलेज-पत्रकार चौक हा रस्ता सावेडी उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, निधी प्राप्त होताच दोन्ही बाजूने आरसीसी गटार, फुटपाथ व दर्जेदार रस्ता निर्माण करू असे आ. संग्राम जगताप म्हनाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्राध्यापक माणिकराव विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक अरविंद शिंदे, शहर अभियंता मनोज पारखे, यशवंत तोडमल, शुभम भुतारे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या