राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
शालेय विद्यार्थ्यांना लागणारे दाखले तातडीने सुपूर्द करा - शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे
नगर : शालेय विद्यार्थ्यांची नुकतीच दहावी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे शैक्षणिक दाखले उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, नॉन क्रिमिनल, आदीसह दाखले अत्यंत महत्त्वाचे असून हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी,पालक यांना दररोज हेलपाटे मारावे लागत आहे अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी व पालक यांची हेडसाळ होत असून सेतू केंद्राबाहेर तासनतास उन्हामध्ये हजारो विद्यार्थी उभे राहत आहे तसेच काही विभागांमध्ये एजंटगिरी जोरात सुरू असून त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय कामकाजासाठी लागणारे दाखले मिळत नाही.
याचबरोबर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जाते तरी जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यार्थ्याला शालेय कामकाजासाठी लागणारे दाखले तातडीने उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्याचे शालेय नुकसान होणार नाही, येत्या दोन दिवसात शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्याचे काम सुरळीत करून द्या, अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादीत विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र पाटील यांना निवेदन देताना शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, शुभम बंब, करण वाघमारे, अनिकेत कोळपकर, राधेय दांगट, ऋषिकेश खोंडे,तन्मय शिंदे, ओंकार आव्हाड, निलेश कदम, नारायण आव्हाड, स्वप्नील भोरे, गोविंद खताळ आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या