महाराष्ट्र राज्य शासन आयोजित "माझी वसुंधरा अभियान - ३.०" अभियानामध्ये अहमदनगर महानगरपालिका ३ लक्ष ते १० लक्ष लोकसंख्येच्या अमृत शहरांच्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्काराची रु.६ कोटी रक्कम महानगरपालिकेस प्रदान करण्यात येणार आहे.
हे यश प्राप्त केल्याबद्दल महापालिका आणि सर्व नगरकरांचे मनःपूर्वक अभिनंदन. या अभियानात सहभागी सर्व अधिकारी, अभियंता, कर्मचारी व या अभियानाला भरघोस साथ दिलेल्या सर्व जनतेचे खूप खूप आभार. नगरकरांच्या अमुल्य योगदानाचे हे यश आहे. इथून पुढील काळातही एकजुटीने असेच कार्यरत राहून आपल्या शहराच्या प्रगतीसाठी झटुयात असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
0 टिप्पण्या