अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हमाल माथाडी पंचायतीच्या २१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व कामगार नेते आदरणीय कॉ. बाबा आढाव यांचे या वयात समाजाप्रती सुरू असलेले कार्य आमच्यासारख्या युवकांना प्रेरणादायी आहे - आ.संग्राम जगताप
आदरणीय पवार साहेब यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये देश व राज्य पातळीवर कामगारांचे विविध प्रश्न सोडविले आहेत. कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कॉ. बाबा आढाव यांनी संघर्ष उभा करीत विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांनी हमालांच्या पाठीवरील १०० किलोचा बोजा कमी करण्यासाठी आंदोलन उभे केले व त्यांच्या आंदोलनाला यश येत बोजा ५० किलो पर्यंत करण्यात आला.
सध्याचे सरकार कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार नाही. या सरकारकडून कामगारांच्या हिताचे कायदे मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. म्हणूनच कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन नगर येथे करण्यात आले आहे. कै. शंकरराव (अण्णा) घुले यांनी नगर जिल्ह्यामध्ये हमाल पंचायतीच्या माध्यमातून कामगार हक्काच्या न्यायासाठी काम सुरू केले. त्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचा वारसा नगरसेवक अविनाश घुले सक्षमपणे चालवत आहेत असे प्रतीीपादन आ संग्राम
जगताप यानी केले.
यावेळी कॉ.बाबा आढाव, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सर्जेराव निमसे, अशोक बाबर, अरुण कडू व विविध कामगार बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या