Subscribe Us

Header Ads

नगर शहर विकासाचे एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे कल्याण रोड नेप्ती नाका सीना नदीवरील पूलासाठी सुमारे 23 कोटी रुपये निधी : आमदार संग्राम जगताप



नगर शहर विकासाचे एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे कल्याण रोड नेप्ती नाका सीना नदीवरील पूलासाठी सुमारे 23 कोटी रुपये निधी : आमदार संग्राम जगताप


  नगर : कल्याण रोड नेप्ती नाका सीना नदीवरील पूल 35 वर्षांपूर्वीचा जुना असून हा पूल रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा पूल पाण्याखाली जात असल्यामुळे वाहतुकीसाठी 15-18 तास बंद ठेवावा लागतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर पुलावर स्ट्रीट लाईट सह इतर सुविधा नसल्याने व जागो-जागी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. याचबरोबर वारंवार अपघातही होत आहे पूलाची उंची कमी असल्याने पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे काही दुर्दैवी घटना घडल्या आहे.हा कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग आहे या पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांनी हे काम मंजूर केले असून या कामासाठी 23 कोटी 42 लाख 64 हजार 7 97 रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे नगर शहर विकासाचे एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे. नेप्ती नाका कल्याण रोड सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागल्यानंतर या भागाच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल .शहर विकासाची कामे करीत असताना पाठपुराव्याला खूप महत्त्व आहे. नगर शहर वासियांच्या विश्वासाच्या जोरावर विकासाची कामे मार्गी लागत आहे. पुलाचे काम मार्गी लागल्यानंतर या परिसराचे सुशोभीकरणा बरोबरच सौंदर्यात भर पडणार आहे. नेप्ती नाका ते ठाणगे पेट्रोल पंपापर्यंत पुलाची उंची सहित रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण होऊन लवकरच कामाला सुरुवात होणार आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाच्या कामा साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगर शहरवासीयांच्या वतीने मी आभार मानतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या