नगरच्या प्रश्नाची जाण नसलेल्या नितेश राणेंनी आमदार संग्राम भैय्या विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा त्यांचा वाचाळ पणा आम्ही खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल - वैभव ढाकने
सध्या अहमदनगर शहराचे वातावरण खराब करन्याचे काम केले जात आहे . स्वतः च्या स्वार्थी महत्त्वकांक्षी राजकीय हेतूपोटी तसेच जनसामान्यांच्या मध्ये कर्तुत्व शून्य असणाऱ्या समाजकंटकाकडून काहीतरी नवीन स्टाईल वापरून तरुणांना आकर्षित करण्याकरता भडकाऊ शब्द प्रयोग करून नको ते प्रयोग केले जात आहेत . आणि तरुण पिढीला या स्वरचित निच नितीहीन राजकीय रणनीतीमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे .
पण कुठल्याही प्रकारचं व्हिजन यांच्याकडे नसल्यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारच्या उपयोजना करण्यासाठी कुठल्याच प्रकारचा प्रयत्न यांच्याकडून यामागे झाला ना यापुढे ते करत आहेत. पण सर्वसामान्य घरातील तरुणांना भडकावून त्यांना जाती -धर्माच्या नावाखाली स्वतःचा राजकीय हेतू साध्य करायचा केविलवाणा प्रयत्न होत आहे कारण त्यांचे स्वकर्तृत्व शून्य आहे .वार्डामध्ये नगरसेवक होता येत नाही आणि आता त्यांना आमदारकीचे स्वप्न पडत आहे त्यांच्या या स्वार्थी केविलवाण्या खटाटोपा पायी ते नगरच्या तरुण पिढीला बळी देण्याचे काम करत आहेत.
पण काही केल्या यांच्या निच प्रवृत्तीला नगरकर कसलााच थारा लागू देत नसल्यामुळे की काय यांना बाहेर जिल्ह्यातून प्रचारासाठी वाचाळवीर म्हणून ओळख असलेला स्वाभिमान विलीन केलेला, सबंध महाराष्ट्रात थू थू झालेला टिच भर नेता घेऊन यावा लागला.
नगर शहराचे बदलते चित्र, शहराची महानगराच्या दिशेने होणारी वाटचाल स्पष्टपणे जाणू लागली आहे त्याच कारण म्हणजे नगर शहराचे तरुण तडफदार आमदार संग्राम भैया जगताप.
- आमदार संग्रामभैया यांचे नेतृत्व पैलू पडलेल्या हिऱ्याप्रमाणे तेजोमय बनले आहे .
- संघटन कौशल्य तरुणाईतील उर्जेला दिलेले विधायक वळण थोरामोठ्यांचा आदर-सन्मान.
- नवनवीन विचार समजून घेत त्याप्रमाणे शहराचा विकासाला वळण त्यांनी दिले.
- लॉकडाऊन च्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी
- व्यापारी- व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.
- कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे असा विश्वास त्यांनी नगरकरांना दिला.
त्यामुळे नगरच्या प्रश्नाची जाण नसलेल्या नितेश राणेंनी आमदार संग्राम भैय्या विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा त्यांचा वाचाळ पणा आम्ही खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकने यांनी दिला .
0 टिप्पण्या