Subscribe Us

Header Ads

काटवन खंडोबा साई कॉलनी येथील ड्रेनेज लाईन समस्याचे आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी

 महापालिका प्रशासनाने तातडीने उपयोजना करून प्रश्न मार्गी लावा : आ संग्राम जगताप 


अहमदनगर प्रतिनिधी: काटवन खंडोबा रोडवरील साई कॉलनी येथे नव्याने मोठी लोक वसाहत निर्माण झाली आहे या परिसरातील ड्रेनेज लाईन,सांडपाणी,मैलमिश्रित व पावसाळ्याचे पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे ढपके साचलेले आहे या परिसरामध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरले आहे डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रोगराईचे वाढली आहे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाला आहे महापालिकेकडे अनेक वेळा प्रश्न मांडून झाले परंतु कुठल्याही उपयोजना केल्या नाही या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला  यावेळी दिल्या आहे  

  आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला  सूचना देत सांगितले की ड्रेनेज लाईन चा प्रश्न तातडीने हाती घ्या या भागातील नागरिक या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहे लहान मुले आजारी पडत आहे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपयोजना करा अशा सूचना दिल्या.यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागनगरे, नगरसेवक अविनाश घुले, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या