मिनी ऑलंपिक स्पर्धेसाठी अहमदनगरजिल्हा मुलींच्या हॉलीबॉल संघाची निवड
नगर - राज्य सरकारने बंद झालेल्या मिनी ऑलंपिक स्पर्धेला 27 वर्षानंतर सुरुवात केली आहे.त्यामुळे विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठी एक पर्वणी निर्माण झाली आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंची करिअर घडले जाते आता क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. हॉलीबॉल खेळाचे मार्गदर्शक शैलेश गवळी यांनी नगर जिल्ह्यातून विवीध खेळाडू घडविण्याची काम केले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हॉलीबॉल च्या मुलींच्या संघाची मिनी ऑलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही अभिमानाची बाब आहे नगर जिल्हा हा खेळाडूंचे माहेरघर म्हणून ओळखले जाते विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेकडे ही वळावे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने मुलींच्या हॉलीबॉल संघाची मिनी ऑलंपिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य हॉलीबॉल संघाचे उपाध्यक्ष शैलेश गवळी, संजय साठे, जिल्हा असोसिएशनचे कार्याध्यक्ष बबन झावरे, खजिनदार संजय अनुभुले, क्रिकेटर अनुपम संकलेचा,सागर भिंगारदिवे, आकाश थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी शैलेश गवळी म्हणाले की, मिनी ऑलंपिक स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा मुलींच्या हॉलीबॉल संघाची निवड झाली आहे अहमदनगर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे. मिनी ओलंपिक हॉलीबॉल स्पर्धेसाठी ऋतुजा मुळे, कल्याणी मोरे, शालिनी चितळकर, धनश्री राऊत, प्रतीक्षा जाधव, प्राजक्ता अथरे, कल्याणी शिरसाठ, रंजना पाटेकर, दीक्षा डाळे, मनिषा कापसे यांची निवड झाली आहे. तर प्रशिक्षक म्हणून किशोर पठाडे, अजय गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या