Subscribe Us

Header Ads

सारसनगर कानडे मळा रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी

 


कानडे मळा रस्ता हा सारसनगर सोलापूर रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता : आ. संग्राम जगताप

नगर- शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत असून नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम सुरू आहे उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे हाती घेतले आहे त्या माध्यमातून शहराच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे रस्त्यांच्या विकास कामांमुळे व्यावसायिकरण झपाट्याने वाढत असते त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असते कानडे मळा परिसरातील नागरिकांनी रस्ता कॉकटीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे स्वतःहून पुढे आले व रस्त्यावरील अडथळे दूर केले सोलापूर रस्ता ते सी एस आर डी कॉलेज पर्यंतचा रस्ता हा सारसनगर उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे नगरसेवक अविनाश घुले यांनी या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला आहे शासन दरबारी पाठपुरावा करून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे या माध्यमातून महापालिका प्रशासनाने जलद गतीने विकास कामे पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलावी जेणेकरून नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले


 सारसनगर कानडे मळा रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक अविनाश घुले,नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपायुक्त श्रीनिवास कुरे,शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते,विद्युत विभाग प्रमुख जोशी रामदास कानडे,पांडुरंग गाढळकर,मिलिंद कानडे, नंदू कानडे, अमित गाडळकर,स्वामी हजारे,दादा पांडुळे, रामदास गाडळकर,चेतन कानडे,बाबासाहेब बोरुडे,रोहित राऊत, अनिकेत रासकर, नामदेव मोडवे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
  नगरसेवक अविनाश घुले म्हणाले की सारसनगर कानडे मळ्यातील रस्ता मार्गी लागणे गरजेचे होते ते काम आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडून मोठा निधी मंजूर करून आणला व नियोजनबद्ध.कायमस्वरूपीचे रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम मार्गी लावले जेणेकरून कानडे मळा सारसनगर परिसराचा विकास कामातून काय पालट होईल आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले नियोजनबद्ध कामामुळे शहर विकासाला एक चालना मिळाली आहे कानडे मळ्यातील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे असे ते म्हणाले





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या