केडगाव शिक्षक कॉलनी च्या वतीने आ.संग्राम जगताप यांचा विकास कामे पूर्ण केल्याबद्दल नागरी सत्कार संपन्न.
नगर - केडगाव उपनगर हे शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे. मा. सभापती भानुदास कोतकर व मा. महापौर संदीप कोतकर यांनी केडगावच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली त्यांनी केंद्र सरकारची फेज १ पाणीपुरवठा मंजूर करून आणली त्यामुळे नागरी वसाहती मोठ्या संख्येने वाढत आहे.केडगाव उपनगराच्या विकासाला निधी कमी पडून दिला जाणार नाही सर्वांना बरोबर घेऊन विकसित उपनगर निर्माण करू नियोजनबद्ध व कायमस्वरूपी ची विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत शिक्षक कॉलनी च्या वतीने विकास कामे पूर्ण केल्याबद्दल माझा जो सत्कार केला त्या माध्यमातून शहर विकासाचे काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळते केडगाव उपनगरामध्ये मोठ्या उद्यानाची निर्मिती करणार आहे विकासाचे एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावण्याची काम सुरू आहे स्वच्छ सुंदर उपनगर म्हणून केडगाव ची ओळख निर्माण करू विकास कामांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन शहर विकासामध्ये हातभार लावावा शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी विकास कामांमध्ये घेतलेला सहभाग कौतुकास्पद असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
केडगाव शिक्षक कॉलनी च्या वतीने विकास कामे पूर्ण केल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक मनोज कोतकर,जालिंदर कोतकर,भूषण गुंड, महेश दळवी,सागर सातपुते, अजित कोतकर, रोहित कोतकर, पोपट कराळे, विजय कोतकर, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, माऊली जाधव, सोनू घेंमुड,वैभव ढाकणे,वैभव तापकीरे अनिल मोरे, अभिजीत कुंभार,योगेश औटी,भैय्या सातपुते,संदीप भोर, रोहन भिंगारदिवे, शेवंता तापकीरे, शारदा औटी शकुंतला कुंभार, आशा काळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या