अहमदनगर दि. जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप यांचे हस्ते डॉ. श्री.प्रकाश कांकरिया,डॉ. सौ सुधा कांकरिया,जेष्ठ नाटककार श्री.सदानंद भणगे, अभिनेते श्री.मोहिनीराज गटणे, श्रेणीक शिंगवी अध्यक्ष श्री.शशिकांत नजान,श्री.अनंत रिसे,युवा दिग्दर्शक श्री.स्वप्नील नजान यांच्या प्रमुख उपस्थितीत .
या वेळी बोलताना आमदार श्री.संग्राम जगताप म्हणाले की समाजात घडणाऱ्या घटनांची नोंद रंगभूमी घेत असते,चांगल्या प्रथा रुजविणे,वाईट घटनांविरोधात आवाज उठविणे,सामाजिक प्रश्नांवर भाष्य करून जनजागृती करण्याचे काम रंगभूमी करते.अहमदनगर चे कला विश्व अतिशय प्रभावी असून सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात.नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येकजन आपल्या पद्धतीने करीत असतात पण सातत्याने २५ वर्ष जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत ही प्रथा आपल्या शहराची ओळख झाली आहे.
या वेळी बोलताना डॉ.सौ. सुधा कांकरिया म्हणाल्या
की जिप्सी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कलाकार तंत्रज्ञ तयार झाले,घडले त्यांना नाट्य-चित्रपटात क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली. तंत्रशुद्ध कलाकार आणि तंत्रज्ञ घडविणे याच बरोबर नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात विविध प्रयोग करणे हे महत्वाचे कार्य या संस्थे मार्फत होत आहे.
नाटका बरोबर नवीन तंत्राचा स्वीकार करत वेबसिरीज क्षेत्रात जिप्सी फिल्म्स नवोदित आणि जेष्ठ कलाकारांना सोबत घेऊन प्रभावी अशी निर्मिती करीत आहे भविष्यात चित्रपट क्षेत्रात नगरला मोठे स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न ही संस्था करते आहे असे श्रेणिक शिंगवी यांनी संगितले.
0 टिप्पण्या