आमदार संग्राम जगतापांकडून मानवसेवेने नववर्षाचे स्वागत
मनगाव प्रकल्पाला भेट; डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचिता धामणे दांपत्य भारावले
नगर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताचा अहमदनगरमध्ये तरुणाईचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच, आमदार संग्राम जगताप यांनी मात्र नववर्षाची सुरुवात मनोविकलांगांच्या सेवेने सुरू केली. आमदार संग्राम जगताप यांची ही कृती अहमदनगरकरांची निरंतर सेवा, हाच त्यांचा नववर्षाचा संकल्प असावा, असे अधोरेखित झाले. "आमदार संग्राम जगताप यांच्या या मानवसेवेने मनगावचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचिता धामणे ही दांपत्य भारावून गेले.
आमदार संग्राम जगताप यांचे मनगाव प्रकल्पाला नेहमीच सहकार्य असते आणि त्यांच्या विधायक कामाचा संकल्प मानवसेवेतून होतो", आमदार संग्राम जगताप हे सामाजिक जाणीव असणारी भूमिका समाजामध्ये मांडणे व युवकांना एक आदर्श ठरणार आहे अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र धामणे यांनी यावेळी दिली.
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सरत्या वर्षाचा निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील देहरे येथील मनगाव प्रकल्पाला भेट दिली. यावेळी आमदार जगताप यांनी प्रकल्पातील मनोविकलांग रुग्णांशी संवाद साधला. यावेळेस डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचिता धामणे दांपत्य उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, जॉय लोखंडे, राहुल ठोंबरे, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, वैभव वाघ, विशाल पवार, मळू गाडळकर, चेतन भळगट, मयूर कुथे, विजय सुंबे, श्री गारडे, शंकर नरसाल, विशाल बेलपवार, शुभम जगताप आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की मनगाव प्रकल्पातील मनोरुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे डॉ.राजेंद्र व सुचिता धामणे दांपत्य यांनी खऱ्या अर्थाने मानव सेवेचा वसा घेतला आहे सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आजच्या युवा पिढीसमोर एक आदर्श असे काम उभे केले आहे डॉ. धामणे दांपत्य यांच्या सेवाभावी वृत्तीतून मानसिक विकारानी पीडित असलेल्या रुग्णांना साठी माणगाव प्रकल्प उभा केला आहे या सेवाभावी प्रकल्पामुळे आपल्या नगर जिल्ह्याचे नाव जगामध्ये उंचावले आहे डॉ.धामणे पती-पत्नी यांनी ज्यांना परिवाराने नाकारले त्यांना मायेचा निवारा माऊलीच्या माध्यमातून देत या प्रकल्पातील मनोरुग्णांची सेवा करत आहे असे ते म्हणाले
0 टिप्पण्या