बोल्हेगाव येथे कै. विशाल भाऊ वाकळे उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न
सभापती कुमारसिंह वाकळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.
नगर - पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे येऊन प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करावा व आपल्या दैनंदिन कामकाजासाठी कापडी पिशवीचा वापर करावा. सभापती कुमारसिंह वाकळे यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला आहे अध्यात्मिक वाढीसाठी भव्य श्री दत्त मंदिराची उभारणी केली आहे. याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची ची लोक चळवळ हाती घेतली आहे. प्रभागातील नागरिकांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात येनार आहे. धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी कै.विशाल भाऊ वाकळे उद्यानाची निर्मिती केली.आम्ही सर्वजण एक विचाराने आनंदाने शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावत आहे. शहरातील नागरिकांनी दिलेले प्रेम व विश्वासाच्या जोरावर चांगली कामे करण्याची ऊर्जा मिळत आहे. आपण सर्वजण एकत्रित येऊन शहर विकासाला गती देऊ असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
बोल्हेगाव येथे मनपा स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून कै. विशाल भाऊ वाकळे उद्यानाचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या संपन्न झाला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मा. स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, संभाजी पवार,दादा दरेकर आदींसह ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळेच नागरिकांचा विश्वास संपादन करू शकलो. प्रभागा मधील विकास कामांबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला प्राधान्यक्रम देत विकासाची वाटचाल सुरू केली सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या