केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी मुंबईतील अली यावर जंग राष्ट्रीय मुकबधीर आणि कर्णबधील संस्थेला (अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसॅबिलिटीज) 29 डिसेंबर 2022 रोजी भेट दिली. या भेटीत भौमिक यांनी 'आझादी का अमृत महोत्सवा'चा/स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, संस्थेमधील "दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विशिष्ट ओळखपत्राच्या" (यूडीआयडी) माहिती फलकाचे अनावरण केले. दिव्यांग व्यक्तींचा राष्ट्रीय पातळीवर माहिती साठा तयार करणे आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्यांच्यासाठीच्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठीचे विशिष्ट ओळखपत्र प्रदान करणे या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना पुरवल्या जात असलेल्या सेवा सुविधा आणि लाभांमध्ये पारदर्शकता येऊ शकेल, अंमलबजावणीची कार्यक्षमता वाढू शकेल तसेच सुलभता आणि एकसामाईकता निर्माण होऊ शकेल. या संस्थेमध्ये राबवल्या जात असलेल्या या प्रकल्पामुळे 'दिव्यांगजन' लाभार्थ्यांच्या भौतिक तसेच आर्थिक प्रगतीबाबत, अंमलबजावणीच्या प्रत्येक स्तरावरच्या म्हणजेच गावपातळी, खंड पातळी, जिल्हा स्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या प्रगतीचा सुरळीत पद्धतीने मागोवा घेता येण्याची बाब सुनिश्चित करण्यातही मदत होईल.
अली यावर जंग राष्ट्रीय मुकबधीर आणि कर्णबधीर संस्थेला (अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसॅबिलिटीज) दिलेल्या भेटीदरम्यान, भौमिक यांनी मुकबधीर आणि कर्णबधीर लहान मुले आणि बालकांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. ही संस्था आणि तेथील कर्मचारी तसेच विद्यार्थी 'दिव्यांगजनांची' विशेषत: मुकबधीर आणि कर्णबधीर व्यक्तींची समर्पण भावनेनं करत असलेल्या सेवा आणि प्रयत्नांचं भौमिक यांनी कौतुकही केलं.
0 टिप्पण्या